Man Mokla Karayla Ek Tari Jagaa Havi
मन मोकळं करायला एक तरी जागा हवी
मन मोकळं करायला
एक तरी जागा हवी
ती ज्याची त्याने शोधावी
सापडलीच तर सोडू नये
कारण
साचलेल्या विचारांचं तळं
जिवघेणं असतं .
त्याला तळ नसतो
असतो केवळ भोवरा
एकदा त्याच्या तावडीत सापडलात
की आपल्याला नेमकं काय हवंय
हे कळायलाच काळ लोटतो …
आणि ते कळतं तेव्हा
वेळ निघून गेलेली असते.
काळाचं अन वेळेच
सूत जुळत नाही ते असं
म्हणून म्हणतो,
मन मोकळं करायला
एक तरी जागा हवी
– गुरु ठाकूर
नाही. या… शी मी सहमत नाही.
मन मोकळं नं होता ही… कळलेलं असतं की नेमकं काय हवंय……….
मन मोकळं करायला जागा हवी आणि ती ज्याची त्याने शोधावी अगदी बरोबर.
काही माणसं स्वत:चीच घट्ट मित्र असतात. त्यांच्या मनाचा तळ कुणाला दिसत नाही…. पाहणाऱ्याला फक्त वर वरचे तरंग दिसतात. आतल्या आत अशी वादळं बेमालूम कोंडून ठेवणं सोपं नाही….त्यांच्या निर्धार आणि निग्रहाची दाद द्यावीशी वाटते….पण असं सांगावं असंही वाटतं….मन मोकळं करायला जागा ‘manus’ आहे….
खरंच आहे , मन मोकळं करायला एक तरी हक्काची जागा हवी , मनात साचून राहिलेले व्यक्त होयला वाट हवी.
असतो केवळ भोवरा.. अगदी बरोबर ..म्हणूनच गर्तेत अडकल्याची भावना होते.. सर खुप सरळ सोपै शब्द असतात तुमचे आणि अर्थही सोपा तरी गहन गोष्टी सांगून जाता.. really happy to read this blog.
अगदी मनातलं कागदावर उतरत तुमच लिखाण म्हणूनच कदाचित ते मनाला भिडत.अगदी पहिल्यांदा वाचलं होत तेव्हापासून मनात ती जागा कायम आहे.
खरंच तुमचं लिखाण वाचलं कि मन मोकळं होऊन जातं.. खूपच सुंदर..
धन्यवाद!
Khup sunder agdi mantala
तुमची मन मोकळी करायची जागा कोणती……?..?..?
मन मोकळं करायची माझी जागा म्हणजे कागद. मनातले विचार जसे जमतील तसे कविता, गोष्टी, चित्र वगैरे रुपाने कागदावर उतरवतो आणि ह्या साईट वरून तुमच्या पर्यंत पोहचवायचा प्रयत्न करतो.
आणि तुम्हाला ते जास्त चांगलं जमतं , सहजच सुचल्या सारखं…..!
Khup chan .
Agreed..
सर तुम्ही नेहमीच आमच्या मनातल लिहिता. तुमच लिखाण वाचलं की खरच मन शांत होत. अणि नवीन विचार करायला किंवा नवीन गोष्टी शिकायला तयार होत. तुम्ही दर वेळी काहीतरी शिकवून जाता. Thank you.
धन्यवाद!