Mobailchya Kachatyatle Aamhi

मोबाइलच्या कचाट्यातले आम्ही

उघडून डोळे रंग जगाचा बघून घ्यावा
क्षण आत्ताचा नसेल पुन्हा ,जगून घ्यावा
अन शोधावा सूर नवा वाटते परंतू
मोबाइलच्या कचाट्यातले आम्ही जंतू

फरार सारी शब्दसंपदा गुंडाळून गाशा
लाडीक, रडक्या आणि बोडक्या चिन्हांची भाषा
हस-या ‘डीपी’च्या डोळयातही हजार किंतू
मोबाइलच्या कचाट्यातले आम्ही जंतू

जिरवण्यात अन मिरवंण्यातुनी आम्ही रमतो
सदैव बडवुन टिमकी अपुली आम्ही दमतो
सेल्फिसाठी शिर तळहाती घेवून कुंथू
मोबाइलच्या कचाट्यातले आम्ही जंतू

शंभर टक्के कधीच नसतो दिसतो जेथे
जाणिव आम्हा या सत्याची परि ना होते
इथले सोडून तिथल्या मध्ये आम्ही गुंतू
मोबाइलच्या कचाट्यातले आम्ही जंतू

– गुरु ठाकूर

3 replies
 1. Dr namita nikade
  Dr namita nikade says:

  I agreed..
  pan agdi khar sangaycha tar tumchi Kavita blog mi mobile madhech vachate.. it’s a gadget. Pan mi tyacha ativapar karne soden aata.
  Thanks

  Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*