कुणाला पोळी कुणाला टाळी
कुणाच्या पायी कुणाला गोळी
कुणाला वाटत़ म्हणून कुणीतरी
उगात ठरतो़य चोर
कुणाच्या चाळ्यामुळे
फुकट कुणाच्या
जिवाला लागलाय घोर
भलत्याचा राडा सलत्याला चिंता
वितभर शंकेचा गावभर गुंता
गुंत्याच्या गाठी बुद्धीला नाठी
भीतीचा चेंगट चोर
कुणाच्या चाळ्यापायी
फुकट कुणाच्या
जिवाला लागलाय घोर
अकलेचा घोडा हैदोस घाली
नितीच्या भिंतीला शंकेच्या पाली
भयाचा भोंगा करतोय दंगा
घेतोया रे वन्स मोर
कुणाच्या चाळ्यापायी
फुकट कुणाच्या
जिवाला लागलाय घोर
कसा कुठे शिरेल कधी पत्ता नाय
साडेबारा शिंगे याला सोळा पाय
सौशयाच्या कीड्याला या औषध नाय
लय नाट लावतोय भलतंतंच दावतोय
टाळक्यात करतोय धईssssकाsssssला
अंतरा
अधीमधी नाय पार डोस्क्यात शिर्तोय
भुंग्यावानी लाग्तोय जिवाला
खरं काय खोटं काय
राडा ह्यो सुटत नाय
ड्येंजर भारी मामला
कसा कुठे शिरेल कधी पत्ता नाय
साडेबारा शिंगे याला सोळा पाय
सौशयाच्या कीड्याला या औषध नाय
लय नाट लावतोय भलतंतंच दावतोय
टाळक्यात करतोय धईssssकाsssssला
यडापिसा कर्तोय आयच्यान छळतोय
उभ्याला बी करतोय उताना
न्हाई भूक न्हाई तान
जाई तोल सुटे भान
भैताड भारी ताप हा
कसा कुठे शिरेल कधी पत्ता नाय
साडेबारा शिंगे याला सोळा पाय
सौशयाच्या कीड्याला या औषध नाय
लय नाट लावतोय भलतंतंच दावतोय
टाळक्यात करतोय धईssssकाsssssला.