My birthday wishes 18th July 2021

माझा वाढदिवस (१८ जुलै) आणि
कौशल इनामदारच्या फेसबुक वर मिळालेल्या सदिच्छा

गुरू आणि चहा – माझे बेस्ट फ्रेन्ड्स!
गुरूशी ओळख कशी झाली आता मला आठवतही नाही, पण माझं आयुष्य ज्या लोकांमुळे समृद्ध आहे त्यापैकी महत्त्वाचा एक मित्र म्हणजे गुरू. गुरूच्या हातात जादू आहे. हातात पेन धरलं तर एक उत्तम कविता होते, गीत होतं, पटकथा होते, नाटक होतं, संवाद होतात; हातात कुंचला धरला तर एक उत्तम चित्र होतं, अर्कचित्र होतं, व्यंगचित्र होतं; हातात कॅमेरा धरला तर बोलकी छायाचित्र होतात; आणि हातात चहाचा कप धरला तर अखंड वाहणाऱ्या, गुरूच्या विनोदबुद्धीचा प्रत्यय देणाऱ्या गप्पा होतात. सलीम-जावेद किती द्रष्टे होते पहा – गुरूच्या लहानपणीच त्यांनी “ये हाथ हमें दे दे ठाकुर!” असं लिहून ठेवलं!गुरूबरोबर मी जे काही थोडंफार काम केलं त्या कामाची मजा आम्ही दोघांनी भरपूर घेतली. हंगामा, यलो असे चित्रपट असोत किंवा ‘जान्हवी’सारखा अल्बम असो, ‘म्हातारे जमीन पर’ सारखं नाटक असो – आमची काम करण्याची पद्धत ठरलेली आहे. नुसतंच भेटून भरपूर गप्पा मारायच्या! गप्पांच्या सत्राच्या शेवटाला गुरूचं गाणं झालं असतं आणि माझी चाल! यलो चित्रपटाच्या वेळी आम्ही रात्री बारा वाजता भेटायचो आणि आख्खी मुंबई गाडीतून फिरायचो. त्यात चित्रपट, त्यातल्या सिच्युएशन्स, त्यातली गाणी या शिवायही अनेक गप्पा व्हायच्या. पहाटे ३ च्या सुमारास गुरूच्या घराच्या खाली आमची गाडी थांबली की गुरू म्हणायचा “माझे शब्द तयार आहेत, उद्या पाठवून देतो.” त्याच्या शब्दांना चालीत उतरवायला मला १५-२० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागलाय असं मला आठवत नाही कारण इतक्या सगळ्या गप्पांमध्ये चाल कुठेतरी आसमंतात तरंगतच असायची!
बहुआयामी, अष्टपैलू असे शब्द कमी पडणाऱ्या या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!छायाचित्र सौजन्य – कैलाश मोहिते आणि गुरू ठाकूर
1 reply
  1. क्षितिजा
    क्षितिजा says:

    Tumchi lekhani satat kahitari sundar ghadvate.
    Pratyek shabda sahaj sundar saj asto.
    Tumchyakadun kadhitari aikayla awdel.

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*