My new song on an auspicious occasion of Ganesh Chaturthi

My new song on an auspicious occasion of Ganesh Chaturthi

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माझे नवीन गाणे. (09-September-2021)

 

धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका
विलय करी विपदांचा मोरया विनायका

तुंदिलतनू लंबोदर गजमुख साकार तू
तिन्ही लोकी वंदनीय अविजित ओंकार तू
व्यापुनी कणकण विराट विश्वरुपधारी तू
भवतारक अंगारक अटळ विघ्नहारी तू
ठेवी शिरी वरदहस्त हे गण गण नायका
विलय करी विपदांचा मोरया विनायका

सदबुद्धी सदविवेक सन्मतिचा स्वामी तू
अणूरेणूत मन वेणूत प्रकट सकलधामी तू
सृजनाचा बीजांकूर सकल सिद्धी दायी तू
कालाच्या आदिअंती सृष्टीच्या प्रवाही तू
देई अभय करुणामय मंगलवरदायका
विलय करी विपदांचा मोरया विनायका

गणाधिशा गुणाधिशा शुंभंकरा शुभानना
हेरंबा गौरीसुता गं गणा नमोनम:

– गुरु ठाकूर

1 reply
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    Guru अत्यंत सुरेख गणेश वंदना लिहिली आहेस. शब्द वाचताना, गाणं ऐकताना backdrop la मला समर्थांचे गणेशस्तवन स्मरत होते.

    गणपतीबाप्पा तुला सदा सुखी ठेवो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो….!

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*