www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

Shabay Shabay

Gazal Khari Kay

Shabay Shabay

आल्गुन फाल्गुन शिमगा नि होळी
फुकाची चिँता जिवाला जाळी.
शिकार झाली बघा सावध आणि
आपल्याच जाळ्यामधे गावलाय कोळी
शबय शबय भलि शबय शबय
शबय शबय भलि शबय भली

धावतोय दिवस रात्रीच्या मागे
स्वार्थाच्या चिंधीला सत्तर धागे
ऊद्याच्या खुंटीला टांगल्या जीवाला
हाव-या आशेचे वारुळ लागे
काळाचा कावळा बोंबलून सांगे
जिथे अती तिथे मातीच झाली
शबय शबय भलि शबय शबय
शबय शबय भलि शबय भली

आहे जे ज्याच्या कडे सरेना खाऊन
नाही तो जगतो जिवाला मारून
भरल्या पोटाची खा खा सरेना
ऊपाशी सांगे बघ भूकच मेली
शबय शबय भलि
शबय शबय शबय शबय भलि शबय भली

Gazal Khari Kay

उरफाट्या गावाचा उर्फाटा चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सशाने शिकार केली वाघाची
शिंव्हाला भिडे गाय …होय म्हाराजा
गजाल खरी काय….होय महाराजा!!!
मुंगीच्या मुताने वाहिला
हत्तीसतीच्या दाराला तांबडी बत्ती
माणूस मेला हातून म्हणून
मांजर काशीला जाय ….होय महाराजा
गजाल खरी काय….होय महाराजा!!!
उभ्या गावामध्ये झाला ठणाणा
मेंढयाने गेंडयाला केला ऊताणा
फुगता फुगता बेडकी बैलाच्या
दुप्पट झाली गे माय … …होय म्हाराजा
होय म्हाराजा गजाल खरी काय….होय महाराजा!!!!!!

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top