www.guruthakur.in
  • Search
  • Menu
  • Twitter
  • Facebook

Mituni Lochane

Mituni Lochane

मिटुनी लोचने घे भिरभिरती
सूर नांदीचे बघ दरवळती
लालचुटुक मखमाली आता
अलगद ही उमलेल
भारुनिया अवकाशच अवघा
खेळ नवा रंगेल..

नवीन नांदी संहिता नवी
हवीहवीशी भूमिका नवी
पात्र होवूनी विरघळताना
गात्र गात्र बहरेल.
भारुनिया अवकाशच अवघा
खेळ नवा रंगेल..

प्रवेश सरला अंक बदलला
अंधारातच मंच मिळाला
पुन्हा तुझ्यास्तव याच तमातून
नवा मंच उजळेल
भारुनिया अवकाशच अवघा
खेळ नवा रंगेल..
-गुरु ठाकुर

चंद्रमुखी - Chandramukhi कानभट्ट - Kaanbhatt Ghuma Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in[nolink] | Powered by: Mastrait
Scroll to top