Nehmich Nasata Achuk Kuni
नेहमीच नसतं अचूक कुणी
नेहमीच नसतं अचूक कुणी
घड्याळ देखील चुकतं राव
जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता
निसटुन जातो हातुन डाव
पडत जातात उलटे फासे
घरासोबत फिरतात वासे
आधाराचे हातही मग
होत जातात दिसेनासे
अशा वेळी मोडु नये
धीर कधी सोडु नये
नशीबाच्या नावानेही
उगाच गळा काढू नये
जेव्हा फोल ठरतात दावे
कळत नाही कुठे जावे
सगळी दारं मिटतात तेव्हा
आपणच आपला मित्र व्हावे
मग अचूक दिसते वाट
बुडण्या आधी मिळतो काठ
हसत हसत झेलता येते
खडक होवून प्रत्येक लाट
म्हणून म्हणतो फक्त एकदा
केवळ इतकं जमवुन पहा
मित्र सखा जिवलग यार
स्वत:तच शोधून पहा.
Great..!!
khupch chhan kavita………