Niwant
निवांत
पडून रहावं एखाद्या
निर्मनुष्य किनाऱ्यावर
चांदण्या गोंदलेलं
आभाळ पांघरुन
सागराची गाज रिचवत
नाळ जोडावी अथांगाशी
वाळूशी सलगी करताकरता
भिनू द्यावा तिच्यातला
निस्वार्थ अलिप्तपणा
आपल्याही वृत्तीत
बांधून टाकावं मनाचं टोक
भणाणत्या वा-याच्या
पदराला अन….
पडून रहावं एखाद्या
निर्मनुष्य किना-यावर
चांदण्या गोंदलेलं
आभाळ पांघरुन
– गुरु ठाकूर
तू कवितेत वर्णन केलेला निवांतपणा किती वेगळा! पण सामान्यांना सहज साध्य न होणारा …. कारण वाळूचा निस्वार्थी अलिप्तपणा भिनायला, मुळात तशी सलगी व्हायला, साधना लागते…
नाळ कुठे याचा ठाव असेल तर पुढे ती अथांगाशी जोडायचा विचार येईल ….
वेगवान मनाला काबूत घेऊन वाऱ्याच्या पदराला ते टोक बांधणं काही सोपी गोष्ट नव्हे ….
आणि परत निर्मनुष्य किनाऱ्यावर चांदण्याचं कोंदण असलेलं आभाळ पांघरून समुद्राची गाज रीचवण ….
एखादा योगीच असा निवांतपणा अनुभवू शकतो .
खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी वर्णन आहे
अणि वाळूतील चांदणचुरा हातात घेत… ?