www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

Japun Japun

SpandanePisatali

Khullam Khulla

Japun Japun (Remix)

Japun Japun

नखरे नबाबी… आयटम गुलाबी
टपल्या हजारो.. नजरा शराबी
नक्को होवू तू येडापिसा ये मौका उठा ले…
जपुन जपुन जपुन जपुन जारे
पुढे धोका आहे….

डोळ्यामधे झींग तुझ्या.. उर्रामधे आग
नक्को पाहु टक्कामक्का.. मर्दावानी वाग
आडपडदा नी भीती कशाला?
संगे इश्काच्या नीती कशाला?
नक्को होवू तू येडापिसा ये मौका उठा ले…
जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे….

नक्को भिडु संधी सोडु डल्ला मारु ये जरा
कोपच्यामधे नक्को सडु कल्ला करु ये पुरा
साला दुनियेचं टेन्शन कशाला
चखले तू भी ये फंडा निराला
नार नख-याची करतेय इशारा घे चान्स आहे
फिकीर विकीर विसर उचल नारे जिथे मोका आहे

-इश्शा-याने छेडु नक्को घायाळ होश्शील तू
शिक्कारीच्या नादामधे शिक्कार होशील तू
कातिलाना ये तिरछी निगाहे
होशवालोंका ढक्क्न उडाये
देख ले जो ये ज़ालिम अदायें वो बच ना पाये
जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे….

Tashaach Leela

होऊन गेले मजनू रांझा पॉप्युलर बडे उनके नाम शाम
तशाच लीला करता मी ही का ठरतो बदनाम..

प्रीत नवी अनुराग नवा
रोज इथे रोमान्स नवा
जाईन जिथे अवती भवती
मी शोधीत असतो चान्स नवा
एक रोमिओ होता ज्याला दुनिया करी सलाम
तशाच लीला करता मी ही का ठरतो बदनाम..

या इश्काची किमया सारी
सारेच इथे गुर्फटलेले
हुकली संधी ज्यांची ते
मजनु होवुन भर्कटलेले
कुणी बघता बघता गेले होवुन ईश्काचे गुलाम
तशाच लीला करता मी ही का ठरतो बदनाम..

Spandane Pisatali

स्पंदने पिसाटली उरात आग गोठली
नशा नवी खुणावते उधाणल्या हवेतली
नको बघू आता दुरून रात चालली विरून
रोम रोम आज पेटू दे
तुफान हे जरा मिठीत घे……

छेड तार ही सतार घे हळू तुझ्या करी
फुलेल एक शिरशिरी शहारल्या तनुवरी
पेटू देत अंग अंग वाजू दे उरी मृदंग
काळ वेळ आज गोठू दे
तुफान हे जरा मिठीत घे………

Khullam Khulla Pyaar

मस्त जवानी चार दिसाची नशा करुया रे इश्काची
रात्र इथे आहे थोडीशी आणिक सोंगे फार
उगाच चिंता करु नको दुनियेला गोळी मार
करुया खुल्लम खुल्ला प्यार.. करुया खुल्लम खुल्ला प्यार
अन्तरा-१
M- हजार शंका नको मनी गं गुलाम केवळ तुझाच मी
F- रंगुन जाते तुझ्याच रंगी विरघळते रे तुझ्यात मी
M- तूझ्या रुपाच्या धुक्यात राणी हरवुन बसलो मलाच मी
F- मुसमुसणा-या मिठीत तुझ्या रे सदैव असते सुखात मी

नको विझु ये साद घालतो रसरसला अंगार
उगाच चिंता करु नको दुनियेला गोळी मार
करुया खुल्लम खुल्ला प्यार.. करुया खुल्लम खुल्ला प्यार
अन्तरा-२
F – तुझ्यानीमाझ्या मधे आतारे नको सावली कोणाची
M- परस्परांतच हरवुन धुंदी आज लुटुया प्रेमाची
F- मधाळ जादू या ओठांची हव्याहव्याशा स्पर्शाची
M- मुक्यामुक्याने समजुन घेउ अबोल भाषा डोळ्यांची

तुझ्या नशेला नसे उतारा झालो मी बेजार
उगाच चिंता करु नको दुनियेला गोळी मार
करुया खुल्लम खुल्ला प्यार.. करुया खुल्लम खुल्ला प्यार

Japun Japun - Rimix

नटखट नटोरी अट्ट्ल टपोरी
आपली खुमारी लैलै लैभारी
भार ज्वानीचा डेंजर पुरा रे
हरपल पुकारे…
जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे…

खाओ पिओ जी भर जिओ
उद्याचा नक्को विचार
टेन्शन विना दुनियेमधे
जगण्याचे फंडे हजार
रंग मस्तीका हरपल नया रे..
चढ गया उसको जिसने पिया रे..
देखादेखी मे जाने कहा वो गुम हो गया रे..
जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे…

ही आग अन ही सनसनी
बोले तो जीवाचे हाल
गल्तीसे भी छेडे कोई
हो जाएगा वो हलाल
चारसो चालीस चा व्होल्टेज पुरा ये
जिंदगी भरका झटका दिला दे..
ऐसे कर्रंट से बचना जरा ये…ढ्क्कन उडाये..
जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे…

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top