Origami
Origami – ओरिगामी
बलदंड वनराज सिंहाचा
क्षणात भित्रा ससा
अक्राळ विक्राळ मगरीचे
क्षणात निरागस फुलपाखरू
एखाद्या कसलेल्या
ओरिगामी कलावांताला
कागदाचे मूळ स्वरूप
अबाधित ठेवून
केवळ निरनिराळ्या
घड्यांच्या मदतीने
बेमालूमपणे बदलता येते
कागदाची ओळख..
पण तुला ते त्याहीपेक्षा
बेमालूमपणे जमलंय
युगानुयुगे
परिस्थिती नावाच्या
एकाच घडीने तू बदलून टाकतोस
अनेकांची ओळख मुळासकट
त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवून
तुझ्यातल्या याच कलावंता समोर
मी नतमस्तक होत आलोय.
नियमीत ..न चुकता..
– गुरू ठाकूर.
👌🙏