Our sculptures and poem – Mumbai Airport

आमची कलाकृती आणि कविता…(मुंबई एअरपोर्ट)

**
फिल्म इंडस्ट्री हे मुंबईचे वैभव.मराठी माणसाची मान उंचावेल असे दादासाहेब फाळकेंचे कर्तुत्व!
मुंबई आंतर्राष्ट्रीय विमानतळावर महान पुरूषांचे म्युरल बनवायचे काम Andrew logan ह्या ब्रिटिश कलाकाराकडे होते. ह्या म्युरल मध्ये अनेक व्यक्तिचित्रे साकारायची होती.भारतीय चेहरे तंतोतंत असावेत म्हणून पोर्टेटच्या लाईन ड्रॉईंगची जबाबदारी माझ्यावर आली. दादासाहेब फाळके,पं.रविशंकर,लोकमान्य टिळक,नेताजी सुभाष चंद्र बोस,बाल गंधर्व,राज कपूर,मधुबाला,सत्यजीत रे,आर डी बर्मन,नर्गीस इत्यादिंची रेखाचित्रे बनवली. मिरर पोर्टेट्स एण्ड्रू लोगन यांनी साकारली. डॉ.आंबेडकर आणि राणी लक्ष्मिबाईंचा पुतळा बनवण्याची जबाबदारीही माझ्यावर होती.
काचेचे अवाढव्य म्युरल आकारात आले. एण्ड्रू लोगन ब्रिटिश कलाकार असल्याने ह्या मराठमोळ्या कलाकृतींचे योग्य विवरण कसे करणार? “मराठीत माहिती असावी” असे मी सुचवले.मग ती जबाबदारी सुध्दा माझ्यावर आली!
मराठीत कवीता असावी असे ठरले.मला प्रसिध्द कवी गुरू ठाकूर यांची आठवण झाली. गुरू ठाकूर यांनी आपल्या भूमिचे,या मुंबईचे सुंदर वर्णन असलेली कविता लिहीली. प्रवाश्यांनी विमानतळावर पाऊल ठेवले ;त्या भूमिची महती सांगणारी ही कविता आहे. ‘थोर पुरूष म्हणजे रत्नेच’ या अर्थाची.
सोबत कवि गुरू ठाकूर यांची कविता जोडली आहे.नक्कीच आवडेल.
**
-मोरेश्वर राजाराम पाटील
आर्टिस्ट,मुंबई
3 replies
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    गुरु, किती अभिमान वाटतो तुझा ते शब्दात नाही वर्णू शकत!
    महाराष्ट्राची पवित्र भूमी आणि तिच्या पोटी जन्माला आलेली रत्ने…थोर पुरुष ( इथे पुरुष हा लिंग वाचक शब्द नसून दासबोधात समर्थांनी सांगितल्या प्रमाणे मनुष्य ह्या अर्थाने ) आणि त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलेली प्रत्येक क्षेत्रातील किर्ती याचं यथार्थ वर्णन कवितेत तू केलं आहेस.
    भावगर्भित, आशयघन आणि अल्पाक्षरी हे कवितेचे खरे सौंदर्य तुझ्या रचनांमधून नेहमीच दिसते, भावते आणि जनमानसाचा कानामनात टिकून राहते.
    मुंबई विमानतळावर विराजमान तुझी ही कविता चिरंतन राहील…..
    तू म्हणतो तसं ” हमारे बाद सिर्फ हमारा काम रहे , हमारा नाम रहे ”
    मित्रा खूप खूप कौतुक तुझे !

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*