झुरते मन हे
झुरते मन हे दिनरात ध्यास तुझा
छळतो भवती हळुवार श्वास तुझा
दरवळतो गंध तुझा रे
ओझरता स्पर्श तुझारे
की भास हा..सांगना..
झुरते मन हे दिनरात ध्यास तुझा
हुरहुर ही आज कसली क्षण हे जुझ्या विना
हरवुन मी रंग भरते स्वप्नी पुन्हा पुन्हा
गहिवरती धुंद दिशा रे
हळवे रोमांचित वारे
की भास हा..सांगना..
झुरते मन हे दिनरात ध्यास तुझा
कधी जुळला सूर सजणा माझ्या तुझ्यातला
उमलुन ही प्रीत खुलली हा जीव गुंतला
झाले बेभान अता रे
जादू स्पर्शात तुझ्या रे
की भास हा..सांगना..
झुरते मन हे दिनरात ध्यास तुझा
– गुरू ठाकूर (१६ मे २०१०)