Panupuri

पाणीपुरी

पाणीपुरी सारखी वागतात
स्वप्नं देखील कधीकधी
काही ढासळतात
ओठांशी नेता नेता
अनपेक्षित पणे हातातच
अन मग सलत रहातात
परीटघडीच्या शर्टावरल्या
डागांसारखी आयुष्यभर
तर काही
झणझणीत ठसका देतात
प्राण कंठाशी येऊन
डोळे डबडबून येईस्तो
ब्रह्मांड दाखवतात
त्या तेवढ्या एका
क्षणातच
(Panipuri Marathi Kavita)
– गुरु ठाकूर
12 replies
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    गुरू, एका पाणीपुरीत किती वास्तव आणि किती आशा ?!

    There are many slips between cup and lips ….असं म्हणायचे आतापर्यंत पण हे पाणीपुरीचं उदाहरण एकदम “अनवट”
    कायम स्मरणात राहील असं

    Reply
  2. Dr namita nikade
    Dr namita nikade says:

    कवितेच पान मध्ये तुमच्या आवाजात ऐकली…. मग मनाला अजून जास्त भोवली. Thank you.

    Reply
  3. Priti
    Priti says:

    कुणी तरी आपले भाव शब्दात मांडले आहेत असं वाटत राहत तुमच्या कविता वाचल्यावर…

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*