Paperweight
पेपरवेट
दिवस विझू लागला
की मनाच्या सांदीला
फडफडू लागतात
शरपंजरी पडलेल्या
स्वप्नांनी भरलेले
दयामरणाचे अर्ज..
अन मग;
त्यांच्यावर काही ठेवलं नाही
तर ते ऊडून घरभर होतील
याची भिती छळू लगते
अशा वेळी कळतं
काळजाच्या दगडाचं
खरं महत्व…
– गुरु ठाकूर
फारच छान
काळजाचा दगड… अगदी योग्य जागी योग्य शब्द सर..
माणसाचं आयुष्य त्याला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. मग पाहिलेली स्वप्नं मनाच्या सांदीकोपऱ्यात पडून राहतात आणि सदसद्विवेकबुद्धीला टोचत राहतात आणि विचारतात, आमचं काय ? हेही खरं की स्वप्नं न पाहता जगणं शक्य नाही. माणसाला स्वप्नाशिवाय जगणं शक्य नाही आणि स्वप्नं माणसाकडे मरण मागतात, हे वास्तव दाहक आहे,.एरवी हेजाणवतं नाही, पण जाणवलं की व्याकुळ करतं.
Paper weight is perfect title …!
what is exact meaning of “sharpanjari” Word…….?
“शर” म्हणजे बाण आणि “पंजर” म्हणजे शरीर. महाभारतातील महा युध्दात कौरवांचे सेनापती भीष्म शरपंजरी पडले होते असा उल्लेख आहे.
………।
Swapnanni bharlele dayamarnache arja…… मस्तच ?
Aplya mule kona dusryache swapn purna honar asel tar kalajavar dagad thevla tari chalel…