नादावला बाई नादावला
कुनापाई जीव नादावला
भांबावला जरा भांबावला
कशा पाई अस्सा भांबावला
अर्ध्या रातीला मी झाले येडीपिशी
माझा डोळ्याला लागेना डोळा
पावनं sss घोटाळा घोटाळा झाला
कोरस
कसा झाला कवा झाला
कदी आनी कुनी केला
कशान घोटाळा झाला
सांग ज्यानं कुनी केला
कदी आला गेला कशी
खबर न्हाई कुनाला
पावनं sss घोटाळा घोटाळा झाला
अंतरा-1
रोजरोज दुरून ईशारा करताय हो
नुसता… तुम्ही नुसता
कायमाय बोलून मिशित मधाळ
हसता… उगा हसता
तुमच्या या खेळात
नजरेच्या जाल्यात ओढू नका
उगाच मांडून नुस्ताच
हो डाव मोडू नका
माझं मलाच मी सांगा रोखू किती
वेड्या जीवाला लागलाय चाळा
पावनं sss घोटाळा घोटाळा झाला
अंतरा-2
रितभात सोडून कारभार दिलाचा करता
.. तुम्ही करता
अवचित माझ्याच ऐन्यात कसे हो
दिसता … तुमी दिसता
रातदिस डोक्यात तुमचाच
इचार नुसता… राया नुस्ता
झालया बेभान
पिरतीचं तूफान उरामदी
किती नी कसं हे
गुपित राखू मी सांगा किती
न्हाई न्हाईच मी जरी म्हणले तरी
उभ्या गावामदी बोलबाला
पावनं sss घोटाळा घोटाळा झाला.