Kasshala Lavtos Nat
कश्शाला लावतोस नाट
धडाचं नाही तुमचं बियानं
तेनंच लावलिया वाट
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट..
पेरतोस मिरची कोल्हापुरची नी
उसाची धरतोस आशा
रिकाम्या हिरीला ईंजान लावतोस
हायब्रीड तुझा तमाशा
नुस्याच करतोस बाराच्या वार्ता
हिशेब पावने आठ..
लई कसाची जमीन माझी तिला
कश्शाला लावतोस नाट..
खुळं पाखरू तुझ्या जीवाचं
झुरतय कोनापाई
कशाला ठेवतंय चोच रिकामी
दान्याला म्हंतय नाही
सुगीच सांगतेय लूटून जाया
शिवार बिनबोभाट
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट..