प्रवास (गायक – सोनू निगम)
कुणा न टळला कुणान कळला
जगण्याचा हा अवघड घाट
कुणी न जाणे वळणा नंतर
कुठे नेमकी सरते वाट …
प्रवास प्रवास हा प्रवास
थकले पाउल शिणले डोळे
रंगही विरले आशेचे
पानगळीच्या वाटेवर मन
हळवे झुंबर काचेचे
सावल्याही सरल्या सुखाच्या
जाळणार किती हा कळेना
प्रवास प्रवास ..
-गुरू ठाकूर
कौन हम
कौन हम आये कहांसे है ये कैसा सिलसिला
अंजानसी इस राह पे हरपल नया है काफिला
जाने कैसा सोज है
ख्वाहिशोंका बोझ है
फैसलोंके दरपे दिलकी
आजमाईश रोज है
जो नही हासील उसीपे हर किसीको है गिला
कौन हम आये कहांसे है ये कैसा सिलसिला
कल जो छूटा हाथसे
लौटकर आता नहीं
है खलिश के आनेवाला
कल नजर आता नही
थाम लेना आज को जब जहां जैसे मिला
जिंदगी किस र तेरा जा रहा है काफिला
-गुरू ठाकूर
हो स्वत:चा सारथी
चांदणे होते उन्हाचे झुळुक होती वादळे
हो स्वत:चा सारथी आभाळ होइल मोकळे
भेद तू भिंती भयाच्या तोड सारी बंधने
हार होवो जीत होवो धर्म आहे झुंजणे
तोच जेता होई ज्याचे ध्येय आहे वेगळे
हो स्वत:चा सारथी आभाळ होइल मोकळे
जिंदगीला एकट्याने दे नवे आव्हान तू
टाकूनी दे कात सारी हो पुन्हा बेभान तू
राहिल्या हाती दिसांचे होउ दे ना सोहळे
हो स्वत:चा सारथी आभाळ होइल मोकळे
– गुरु ठाकूर
प्रवास (गायिका – श्रेया घोषाल)
मनासारखा ऋतू बदलतो
वसंत फुलतो जणू शिशीरात
वळणानंतर गवसून जाते
हवीहवीशी अनवट वाट
प्रवास प्रवास प्रवास
गोड गुपित हे जगण्यामधले
वळणावरती उलगडते
सावरणारी सोबत असता
जीवनगाणे दरवळते
सूर ही उमलतो सुखाचा
हाती हात हलके मिसळता
प्रवास प्रवास प्रवास
जुळून येती नवे तराणे
रंग नवे भरती जगण्यात
विरुन जाती विवंचनाही
सदैव जेव्हा असतो ध्यास
प्रवास प्रवास प्रवास
-गुरू ठाकूर