Punha Ekda – पुन्हा एकदा
पुन्हा एकदा…
होय..
फुलपाखरंच असतात सारी
स्वप्नांचे,आकांक्षांचे,
आत्मविश्वासाचे
रंगीत पंख मिरवत
आपल्याच जगात भिरभिरणारी
विश्वासानं कुठल्याही फुलाच्या
अंगा खांद्यावर बागडणारी
निरागस..भाबडी..
फुलपाखरं..
पण मग कधी तरी
हळूहळू बदलत्या
ऋतुंसोबत येत जाणाऱ्या
जबाबदारीच्या कोषात
शिरताना अडचण होऊ नये
म्हणून
कुणास ठाऊक कधी, कसे
काढून ठैवतात
आपले पंख आपल्याच
नकळत..
आणि पुन्हा
होत जातं एका फुलपाखराचं
सुरवंटात रुपांतर
त्यांच्याही नकळत..
तेव्हाच त्यांना गरज असते
एका अशा उबदार कोषाची
ज्याची विण असेल कृतज्ञतेची
आपुलकीची प्रेमाची
हळव्या तरल जाणिवेची
त्याचे हरवलेले पंख अलवार पणे
त्यांना पुन्हा बहाल करणाऱ्या
संवेदनशील परिसस्पर्शाची …
त्याच्यातलं हरवलेलं फुलपाखरू
त्यांना पुन्हा एकदा गवसण्याकरता..
कायमचं..
– गुरू ठाकूर.
Apratim
Omg yes! absolutely true!
परीस स्पर्श
किती कमी आयुष्य असतं नाही फुलपाखरांचं ! पण किती जिवंत आणि हसरं करतं आजूबाजूचा परिसर. किती जगलात यापेक्षा किती सुंदर
जगलात हे महत्वाचं !
जवळजवळ गेली दीड वर्ष आपली स्वप्नं, आकांक्षा, आत्मविश्वास…. जिविताचं साधन गमावून बसलेल्या लोकांना उबदार, तरल मैत्रीचा हात आणि संवेदनशील परिसर मिळाला तर नक्कीच त्यांना, त्यांच्या आशेला पंख फुटतील आणि आनंदानं भिरभिरु लागतील ती…..!
तुझ्यासारख्या संवेदनशील कलावंतानं माणसांच्या मनाला केलेला हा परिसस्पर्श निव्वळ अजोड !
फुलपाखरू तर अळी पासून तयार होते.
त्याचे पुढे सुरवंटात म्हणजे अळीत रूपांतर होते,
म्हणजे फुलपाखरू सर्वञ फुलपाखरेच पसरवते का ?