Pustakdinachya Manpurvak Shubhechcha

पुस्तकदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

घरातल्या बंद कपाटात
मोकळ्या शेल्फवर
पलंगाखाली नाहींतर
अडगळीच्या कोपऱ्यात
जिथे सापडेल तिथून उचला
तुमच्या स्पर्शासाठी
आसुसलेलं एक पुस्तक
अगदी तुम्ही पूर्वी वाचलेलं
का असेना
धूळ झटकून उघडा
शक्य तितके वाचा
निराश नाही करणार ते
काहीतरी नवे सापडेल
किंवा जुनेच नव्याने उमगेल
मग मिटून ठेवताना
दुमडा एखादा कोपरा
खुणेचा म्हणून
नाही दुखावणार ते
त्यालाही हवंय हे सारं नेहमी
पण तुम्हाला शक्य नाही
किमान आज तरी द्या त्याला
ते सारं काही
मदर्स डे ला देता ना
मोठठ चॉकलेट आईला
वेळातवेळ काढून भरपाई म्हणून
अगदी तसंच…
-गुरू ठाकूर

2 replies
 1. Siddhi
  Siddhi says:

  Pushtakansarkhi mitthi ayushat kuni marli nahi, agadi ghatt mithi, ani mala sudha sodavasa man nahi karat. Their embrace is warm, tight, loving and understanding. Books are life.

  Reply
 2. Dr namita shivaji nikade
  Dr namita shivaji nikade says:

  सर, तुम्हालाही खुप शुभेच्छा.. अणि तुमचेही पुस्तक लवकर प्रकाशित होवो, ही सदिच्छा.
  आज शंकर पाटील सर ह्यांचे “वळीव” हे पुस्तक विकत घेवून वाचायला सुरुवात केली..
  Thank you, stay blessed.

  Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*