Aaichyan ra
आईचान र
घरदार सोडुन सारं वाऱ्यावर्ती
उंडारु काळीज म्हंतं डोळं झुर्ती
भुकतान हरली सर्ली चिंताबिंता
सपनांची दुनिया डुचकी हाका देती
जरासं उनाड मनाचं ईंजान
उडतंया धाड धाड हो
आयचान र
धावलं धावलं धावलं तुफान रं
याड नाही फ्याड नाही ग्वाडहे सपान रं
अंतरा –
नाही खुळं थाऱ्यावर
मस्तीत भन्नाट कारं वागतं
भिरभिरतं वाऱ्यावर,
ताऱ्याचं आभाळ हाती मागतं
टल्ली टल्ली झालंया येडं का बरं?
फिल्मी फिल्मी होउन गेलंया खरं
जरासं उनाड मनाचं ईंजान
उडतंया धाड धाड हो
आयचान र
धावलं धावलं धावलं तुफान रं
याड नाही फ्याड नाही ग्वाडहे सपान रं