सख्या रे घायाळ मी हरीणी
आतुर डोळे तुझ्याचसाठी
व्याकुळ वेडी काया
जीव उताविळ आसुसला
मिठीत तुझ्या मिसळाया
बंध जगाचे अखेर सारे आले भिरकावूनी
सख्या रे…. घायाळ मी हरीणी
गुरफटलेले पाऊल फसवी
गर्द धुक्याची वाट
अन शंकेच्या खांद्यावरती
विश्वासाचा हात
अनाहुताच्या भयात कारे गेले मी हरवुनी
सख्या रे …घायाळ मी हरीणी.
नाद करायचा नाय
हे दम लय नावात वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोया फाडून टाकतोया गाडून
आडव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय आपला नाद करायचा नाय
उगा चॅलेंज घेतलंस भावा
ढाण्या वाघाचा छेडलास छावा
भल्याभल्याना पडलाय भारी
आपला हक्काचा गनिमी कावा
मर्दानी छातीचामाज हाय मातीचा
थोडक्यात उडायचं नाय
आपल्याला नडूनडोक्यावर चढून
आडव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय आपला नाद करायचा नाय
असा दिलाय भारी दणका
तुझ्या ध्यानात राहिल झणका
आता मिजास नाही कुणाची
आपल्या पाठीशी आहे जनता
आपल्याच चालीनेआपल्याच ढालीने
आपल्याशी लढायचं नाय
आपल्याला नडूनडोक्यावर चढून
आडव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय आपला नाद करायचा नाय