Rangankit
रंगांकित
भेटीलागी आले।
रंगांचे सोयरे।
म्हणती कायरे।
रंग तुझा।।
वदलो बा माझी ।
पाण्याचीच जात।
भेटल्या रंगात।
मिसळतो।।
हरखले सारे।
झाली गळाभेट।
गेला रंगभेद।
विरोनिया।।
जाहलो त्या क्षणी।
साऱ्यांचा सोयरा।
रंगी रंग सारा ।
एक झाला।।
– गुरु ठाकूर
तू साऱ्यांचा सोयरा आहेस, हे तुझे सामान्यत्व तुला उंच घेऊन जाते. व्यक्तीकडून समष्टीकडे जाणे जेव्हा जमते, तेव्हा अनुभव वेगळी उंची गाठतो. हे तुझं असामान्यत्व !
धन्यवाद! सामान्य राहिलं की रिकाम्या झोळीने अनुभव वेचता येतात. त्यामुळे सामन्यत्व जपणं मोलाचं आहे.
धन्य…. संत गुरूनाथ ठाकूर महाराज…!!! असेच म्हणावेसे वाटतेय. अप्रतिम….!!!
???
संत, महाराज म्हणावंसं वाटतंय तिथेच थांबा. कृपया म्हणू नका. एक सामान्य माणूस आहे मी आणि तसंच राहण्यात आनंद मानतो.
किती छान ?… जो सण वर्णभेद जातीभेद विसरण्याचा सल्ला वर्षानुवर्ष देत आहे, जो वेगवेगळ्या भावनांची माणसे रंगवतो..अश्या सणाचे मार्मिक वर्णन त्यांच्या लेखणीच्या रंगातून, ज्यांची लिखाणाची सुरुवातच रंगांपासून झाली आहे….
होळीच्या अणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.. तुमच्या आयुष्यात अणि लेखणीत रंगांची उधळण कायम व्हावी.. हे रंग कधीच फिके पडू नयेत, हीच सदिच्छा.
धन्यवाद!
आपल्या सारख्या चाहत्यांचे प्रेम, प्रतिक्रिया, सदिच्छा आणि सकारात्मक टिका सतत मिळत राहो ही अपेक्षा.
Va surekh.