कुकुर कोंबडो
ए, खाटीबुडी दडा नको हलव जरा कुलो…
आळसबोड्या उघड डोळे दिवस माथ्यार इलो…
मेल्या बापुस काढी गळो आटप तुझो पसारो!!
कुकूर कुकुर कुकुर कुकुर कोंबडो घालता कुकारो..
पोराक टोराक गावात ढोरांक
सांगता सुके गजाली..
कानात काडी नि तोंडात इडी ह्
येच्यात इरड गेली…
मेल्या खिशात नाय जर आणो फुलव नको पिसारो
कुकूर कुकुर कुकुर कुकुर कोंबडो घालता कुकारो..
उताणी रेडो नि बांगर पाडो
तसली तुझी रे तऱ्हा..
निसती टाकुन ढेंगार ढेंगा
म्हणतस लगीन करा..
मेल्या रातचो व्हयो सोरो तुका, फाटेक उतारो…
कुकुर कुकुर कुकुर कुकुर कोंबडो घालता कुकारो..
– गुरु ठाकूर
( खाटीबुडी – खाटेखाली, ईरड – कामाचा वेळ/ घटका , बांगर पाडो – वळू ,सोरो – दारु )
गीत – कुकुर कोंबडो
चित्रपट – रेडू
संगीत – विजय नारायण गवंडे
गीतकार – गुरू ठाकुर
स्वर – मनिष राजगीरे
देवाक काळजी रे
होणारा होतंला जाणारा जातंला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको
येईल दिवस तुझा हि माणसा
जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा
इसार गजाल कालची रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
सोबती रे तू तुझाच
अन तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट चाल एकला
होऊ दे जरा उशीर
सोडतोस का रे धीर
रात संपता पहाट होई रे पुन्हा
देवाक काळजी रे ,माझ्या देवाक काळजी रे
अंतरा – १
फाटक्या झोळीत येऊन पडते
रोजची नवी निराशा
सपान गाठीला धरत वेठीला
कशी रं सुटावी आशा
अवसेची रात नशिबाला
पुनवेची आस पदराला
होईल पुनव मनाशी जागव
खचून जाऊ नको
येईल मुठीत तुझ्याही आभाळ
माघार घेऊ नको
उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या
पाऊल रोखू नको
साद घाली दिस उद्याचा नव्याने
इसार गजाल कालची रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
(इसार – विसर , गजाल – गोष्ट)