Risky Click

रिस्की ‘क्लिक.’

कोकणातला पाऊस बराचसा टिपून झाला तरी काही गोष्टी राहुनच गेल्या होत्या त्यातलाच एक किंग फिशर. त्याच्या शोधात निघालो. सोबत हौशी दोघेजण, त्यातल्याच एकाने अचानक अतिशय चोरट्या आवाजात खबर दिली. पलिकडे पहा मी नजर फिरवली थोड्याशा मोकळ्या जागेत मला तो दिसला `गोल्ड्न ब्यूटी’ माझ्या तोंडुन निघुन गेलं कारण किंचित सुर्यकिरणात तो नागराज फण्यावर १० चा आकडा मिरवत तसाच चमकत होता.

माझ्या कॅमे-याला फिक्स लेन्स होती अन ती बदलत बसायला वेळ नव्हता त्यामुळे जवळ जाणं भाग होतं. मी दबक्या पावलानी सरकलो..गुडघ्यावर बसलो एक क्लीक केला…सापाला ऐकू येत नाही असं ऐकलं होतं त्या मुळे जोवर तो पहात नाही तोवर भिती नाही मी पुन्हा क्लिक केलं. आता फक्त ३-४ पावलांचं अंतर. तो वळला की समोरुन एक क्लिक करायचं अन त्याच चपळाईनं सट्कायचं असं पक्कं ठरवून पार दोन्ही कोपरं जमीनीला टेकतील इथपत वाकलो फोकस करुन वाट पहात आणि तो वळला मी क्लिक केला अन काय होतंय हे कळायच्या आत तो कॅमे-यावर झेपावला..त्याच गतीने मी पलीकडे स्वत:ला फेकुन दिलं. सोबत असलेल्यांच्या तोंडून अस्फुट किंकाळ्या बाहेर पड्ल्या.

काय होतंय कळण्या आधी तो शेजारच्या झाडीत अंतरधान पावला. मी उठलो. हादरलेल्या सोबत्यांनी प्रेमापोटी शीव्यांचा वर्षाव सुरु केला होता.पण माझं लक्ष केंद्रीत झालं होतं कॅमे-या कडे.कारण त्या प्रसंगावधानाच्या क्षणीही माझ्यातला फोटोग्राफर सजग होता की नाही काहीच आठवत नव्हतं.मी घाईने लास्ट क्लिक तपासला आणि ओरड्लोच ‘येस्स्स’…कारण तो क्षण टिपण्यात मी यशस्वी झालो होतो. थरार या गोष्टीचा होता की मी केवळ दोन फुटावरुन मृत्युला हुलकावणीच दिली नव्हती तर त्याचं रुप कॅमे-यात बंद ही केलं होतं. उत्साह ओसरल्यावर जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा आनंदाच्या जोडीनेच भितीची एक थंड लहर अंगभर पसरत गेली.

4 replies
  1. Dr. Aarati Shinde
    Dr. Aarati Shinde says:

    OMG….
    just incredible click…..
    👌👏🏼👏🏼👏🏼
    But seems scary too as it’s very close too…
    Really take care Sir while clicking…

    Reply
  2. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    My goodness !Guru itna bhi chhane ki kya jarurat ? Your life is precious than the click…. No wonder the click is fantastic …
    woh ” Hindi mein kahte hai ki duniya mein maut jaisi koi khubsurat cheez nahi … ” Pn ataa marathit sangte te vakya vakyach rahu de …
    dar ke aage jeet hai sab theek hai par…
    Jeev sambhalun please…

    Reply
  3. Dr namita nikade
    Dr namita nikade says:

    सर, please जीव सांभाळून करा काही करायचे आहे ते.. अणि शक्य झाल्यास तुम्ही क्लिक केलेला तो pic इथे upload कराल का?

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*