Chand Tu Nabhatala
चांद तू नभातला
नि बावळा चाकोर मी
गुलाम होऊनी तुझा
उभा तुझ्या समोर मी
तू चंचला तू कामिनी
तू पद्मिनी तू रागिणी
तना मनात माझिया
तुझी सदैव मोहिनी
उरात श्वास कोंडतो उगा अशी… नको रुसू
शोधू संग नेमके कुठे प्रिये… तुझे हसू
तू प्रेमला तू शामला
तू कोमला तू दामिनी
वेन्धळा जरी तुझाच चित्तचोर मी
पाहत तू ग मलमली कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली
तू रोहिणी तू मानिनी सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी