www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

केवड्याचं पान तू – Kevdyach Paan Tu

Kevdyach Paan Tu

केवड्याचं पान तू

तो – केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

ती – सागराची गाज तू गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याच॔ सपान तू

ती – तू रे गाभुळला मेघ
तुझ्या पिरतीची धग
माझ्या ओंजळीत सुख माइना

तो- तूझा मातला मोहर
तुझ्या मिठीत पाझर
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना

ती- मेघुटाची हूल तू चांदव्याची भूल तू
भागंना कदी अशी तहान तू

तो – केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

ती – तुझ्या डोळ्यांची कमान
तितं ववाळीन प्रान
व्हइन फुफाट्यात तुझी सावली

तो – तुझ्या जोडीनं गोडीनं
हारपुनी देहभान
आनू लक्षुमीला सोनपावली

ती – जगन्याची रीत तू
खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुन्याइचं दान तू
केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

– गुरु ठाकूर

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top