Shabda Kodi
शब्दकोडी
शब्दकोड्यासारखी असतात
काही माणसं
तुकड्या तुकड्यांत दिसणारी
काळ्यापांढऱ्या चौकोनात
अगदी काटेकोर बसणारी
आपण रित्या रकान्यांत
उगाच फिरत रहातो
कळतील तसे अर्थ लावून
नेमके शब्द भरत रहातो
पण जेव्हा उभा रकाना
आडव्याशी जुळत नाही
याच अर्थाचा नेमका शब्द
काही केल्या मिळत नाही
तेव्हा होतो तिढा तिथे
आणि घट्ट बसते गाठ
बघता बघता जीव काढतात
उभे आठ आडवे आठ
मागे पुढे उलट सुलट
संपून जातो सगळा शोध
उगळून सरतो अक्कलखडा
पालथे पडतात अर्थबोध
उभाच मग कुठुनसा लागतो हाती नकळत
आधीचे आडवे सारे चूक दाखवून देतो गल्लत
तेव्हा लागतात संदर्भ आणि तिढा सुटतो
अजून माणसं कळत नाहीत म्हणून
जीव मात्र तुटतो
– गुरु ठाकूर
खरंच कधी माणसं ओळखता येत नाहीत तर कधी त्याचं गूढ मन.
कधी कधी प्रश्न पडतो का वागली ही व्यक्ती आपल्याशी असं? काहीच कारण नसताना आपणच आपल्याला दोषी ठरवतो….विचार करून अकलेचा सुद्धा भुगा होतो ….संदर्भ एकच लागतो सरते शेवटी …आपणच चुकलो का माणूस ओळखण्यात?
खूपच सुंदर.
So very true..I recently watched the Kavitecha paan episode featuring you. What you have said then is right. विचार तुमचे असतात पण कागदावर उतरून आमच्यासमोर येतात तेव्हा वाचताना आमची खात्री असते की हे आपल्याच मनातलं आहे. कमाल!
कोडं सुरेख.. उभा 8 न आडवा 8 खरंच नाही जुळत आहे सध्या. उभा खरा मानावा तर आडवा काही वेगळा भासतो.. आणि आडवा correct आहे म्हटलं तर उभा शब्द बदलावा का हा प्रश्न. खरं तर जसे कोडे सोडवत चालले आहे तशी गुंतत चालले आहे दोन्ही शब्दात.. चूक बरोबर माहीत नाही.. कोडं अर्धवट राहिलं तरी चालेल पण आता eraser नाही वापरायचं मला..
हीहीही … मस्तच लिहिले आहे .
अगदी खरं आहे .शब्द कोडयाचा संदर्भ घेऊन खुप छान लिहिले आहे .
???? I had.. & still having this experience…
माझी आई खूप ओरडते मग अणि पुन्हा तोच प्रश्न विचारते मला की, “तु लोकांवर विश्वास का ठेवतेस? तूला माणसं ओळखायला येत नाहीत”
त्यावेळी मी फक्त निशब्द.