Shapath Tula Aahe
शपथ तुला आहे (विडंबन)
परवा कुठेशी वाचलं या जगात सर्व माणसांना काही काळ फसवणं शक्य आहे तर काही माणसाना सर्व काळ फसवणं शक्य आहे.पण सर्व माणसांना सर्व काळ फसवणं कदापी शक्य नाही.अर्था्त या म्हणीचा उगम परदेशात झाला असावा किंवा स्वातंत्र पूर्व कालात तरी.तुम्ही म्ह्णाल कशावरुन हा अंदाज ? तर ज्या देशात गेली कित्येक वर्षे निवडणूक नावाचा सर्वसामान्यांच्या जाहीर फसवणूकीचा साग्रसंगीत सोहळा अतिशय दणक्यात पार पड्तोय त्या देशातला नागरीक भांगेच्या तारेत तरी असलं काही विधान करणं शक्य आहे काय? तेच नेते,तीच तशीच आश्वासनं, तेच छातीठोक दावे, तीच चिखलफेक,तोच खुळा आशवाद आणि पुन्हा तीच फसगत…असं कसं होत? अंधश्रद्धेपेक्षाही भयानक गोष्ट आहे ही. कोण करणार याचं निर्मूलन ? कसा होणार यात बदल? की दर निवडणूकी नंतर फसगत झालेला मतदार पश्चात्तापदग्ध होत हेच गाणे गात रहाणार?
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
प्रचारसभेतिल भाषणांची शपथ तुला आहे
स्वर इतका भावुक होता
पसरलेस हात
बळेबळे वाकून लेको
काढलेस दात
ओशाळ्या त्या हसण्याची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
निश्चित मी निवडुन येता
होइन तुझा दास
म्हणता तू इतुके माझा
गहिवरला श्वास
त्या फसव्या शब्दफुलांची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
निवडुनी परी येता मज तू
बनवलेस “मामा”
गच्च तव तिजोरी,माझा
खिसाही रिकामा
त्या पुढल्या मतदानाची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
NOTA is good option but not show significant change .cause of nota we have claim of
re- election ,पण तुम्ही लिहलं आहे तसं आपण फसतच आहोत. I become constituen from 2015 but yet not do this माझ्यासाठी हाच मोठा प्रश्न की voting करायचं की नाही …!?