Punha Din Raat
कळले नाही कधी ऊसवले
लक्तर जगण्याचे
गेले फाटुन ऊडण्या आधी
पतंग स्वप्नांचे
नशिबी आली वणवण फरपट
कारण चुकली वाट
नकोस गिरवू तीच ऊजळाणी
तू ही पुन्हा दिनरात
तरणा-याला लाख सोबती
खोल असे तळ बुडत्याच
फसवी स्वप्ने विरता ऊरतो
वणवा केवळ जगण्याचा
करपुन जातो ऊभा जन्म मग
मुकाट त्या वणव्यात
नकोस गिरवू तीच ऊजळाणी
तू ही पुन्हा दिनरात