Shwasanchya Talaavari
श्वासांच्या तालावरी
श्वासांच्या तालावरी स्वप्नांचे झुंबर हाले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले
हव्यास नव्या दिवसाचा कधी पाठलाग ना सोडी
अन आस उद्याची वेडी थकलेले पाउल ओढी
ती पहाट नाही दूर अंतरातून कोणी बोले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले
झाकल्या मुठीतुन वाळू निसटावी तसेच होते
किती बांधून ठेवू म्हटले आयुष्य फरारी होते
सरणाच्या फांदीवरही पालवी कोवळी डोले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले
पाहिला जाळून तरीही सुंभाचा पीळ सुटेना
जगण्याचा तसाच गुंता गुरफटला जीव निघेना
उसवावे तरी किती हे गुरफटणे नियमीत झाले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले
सरणाच्या फांदीवरही पालवी कोवळी डोले
चर्रऽऽ झालं वाचून मनांत..विषण्ण वास्तव आहे