Sukhanshi Bhandato Aamhi
झोकुनी धुंदी यशाची झिंगताना
मृगजळाचा माग काढत हिंडतो आम्ही
…सुखांशी भांडतो आम्ही
भासांमागुन धावत सुटतो जगायचे परी राहून जाते
हव्यासाच्या लाटांनी ते घर वाळूचे वाहून जाते
चुकले कोठे हिशेब याचा मांडतो आम्ही
…सुखांशी भांडतो आम्ही
जाती भावना करपुन जेव्हा हवे हवे ची हाव न सरते
विरुन जाती नाती केवळ व्यवहाराची चौकट उरते
चौकटीत त्या आयुष्याला कोंडतो आम्ही
…सुखांशी भांडतो आम्ही