Techno Worry
Techno Worry
आजच्या टेक्नोसॅवी युगात
जन्माला आलेली “स्मार्ट” पिढी
कधी काळी डोळे मिटून
बालपणात शिरेल तेव्हा
भरवणाऱ्या हातामागच्या
चेहऱ्याऐवजी
मोबाईल स्क्रीन
नाहितर कार्टून चॅनेलवरले
चित्र विचित्र चेहरे
अन संदर्भहीन बडबड आठवून
हळवी होईल का तशीच?
जसे आम्ही होतो
हा काउचा हा चिऊचा
हा हम्माचा हा मनीचा
म्हणून भरवणारा मायेने
अोथंबलेला चेहरा आठवून…
-गुरु ठाकूर
सर, भरवणारा “हात” नसेल कारण आजकाल अगदी लहान बाळालाही म्हणजे नऊ दहा महिन्यांच्या बाबूलाही किंवा फार फारतर दीड दोन वर्षांच्या मुलांनाही चमच्याने भरवतात. हाताने जेवणे, हे थोड मागे पडत आहे. So लक्षात राहण्याच्या वयापासून त्यांचा mind सेट असाच होतो की अन्न हे चमच्याने खाल्लं जात. त्यात आपल्याला कोणीतरी घास भरवला होता हे त्यांच्या लक्षात रहाणं अणि त्याची त्यांनी आठवण काढणं, हळव होण निव्वळ अवघडच दिसतय..