Ti….
ती…
खोचते वीज पंखात तरी पदरात
तिच्या सांडून चालली माया
ओठात हसू गोंदून उभी निक्षून
जणू आभाळ उभं पेलाया
ती अनुरागाची अोल हरवुनी तोल
स्वये शृंगार जिथे मोहरतो
ती समर्पणाची शर्थ प्रीतीचा अर्थ
तीच्या त्या गात्रांतून पाझरतो
ती सती रती रेवती कि तारामती
तिचा गं रोज निराळा गंध
ती नदी मत्त मोकळी जी आतुर जळी
तोडण्या सज्ज रुढींचे बांध
-गुरु ठाकुर
Wa…..
My most favourite song. एक नंबर….!