रंगबाव-या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कुणाचे
हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना
मला भान नाही जगाचे
मला वेड लागले कुणाचे
नादावला धुंदावला
कधी गुंतला जीव बावरा
नकळे कसा कोणामुळ॓
सूर लागला मनमोकळा
आभास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाहीदिशा
मला वेड लागले प्रेमाचे
जगणे नवे वाटे मला
कुणी भेटले माझे मला
खुलता कळी उमलून हा
मन मोगरा गंधाळला
आभास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाहीदिशा
मला वेड लागले प्रेमाचे
पैल्या धारेच्या प्रेमाने साला
कालीज केलाया बाद
ही पोली साजुक तुपातली तिला
म्हाव-याचा लागलाय नाद
आरून आरून करु नको ईशारा
भिरुदे आता डोल्याला डोला
हितं बी ठिनगी तिथंबी ठिनगी
जोसानं पेटूदे आग
ही पोली साजुक तुपातली तिला
म्हाव-याचा लागलाय नाद
चोरून जरी हा गॅटमॅट झाला
खबर झायली कोली वा-याला
लागंलाया आता तोल सुटाया
ईस्काची फुटलीया लाट
ही पोली साजुक तुपातली तिला
म्हाव-याचा लागलाय