Kon Jane
कोण जाणे
कोण जाणे
काय जुळले
भावनांना हि ना कळले
कालचे परके कुणीचे
काळजाला आज भिडले
चालता चालता
सोबती मी असे
ना कळे का नको
वाटते थांबणे
नेमके हे कुठे
धावणे तुझे
का कधी ना कळले तुला
वागणे तुझे
का असे रे ऐन वेळी
हे तुझे हरवणे
सापडेना ओळखीची
अजूनही वाट का तुला रे
गुंतण्या मना
चालता चालता
सोबती मी असे
ना कळे का नको
वाटते थांबणे
उत्तरे शोधती
प्रश्न हे नवे
बंध का नकळेते असे
वाटती हवे
सोडताना हात का हे
गुंतणे उमगते
ओढ लागे हि कशाची
थबकती पावले
कशाला हि पुन्हा पुन्हा
चालता चालता
सोबती मी असे
ना कळे का नको
वाटते थांबणे
-गुरू ठाकूर