कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नी कुणासाठी
आसवांत भिजवावा
जीवहा… सांगना…
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा
अंतरा 1
सैरभैर झालं मन
हारपलं देहभान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजाउ त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीवहा… सांगना… सांगना…
अंतरा 2
जिथे तिथे तुझी हुल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा
गुला बाची कली बगा हलदीनं माखली
आली लाली गो-या गाली उतूउतू चालली नटुन थटुन लाजते जनू चांदनी
नटुन थटुन लाजते जनू चांदनी
कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना
कोण हळूवार गाठ रेश माची बांधतो
कोण हलकेच तार काळजाची छेडतो
कधी कधी देतो कुणी नजरेचा ईशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
चढते भिडते जादू नजरेची अशी
चढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बाव-या जीवाला लावते
मन विसरून वाट सैरभैर धावते
गुला बाची कली बगा हलदीनं माखली
आली लाली गो-या गाली उतूउतू चालली नटुन थटुन लाजते जनू चांदनी
नटुन थटुन लाजते जनू चांदनी
डोलते बोलते सनई तालासंगे
डोलते बोलते सनई तालासंगे
सूर हळवे असेच जन्म सात राहूदे
ऊमलुन प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे
गुला बाची कली बगा हलदीनं माखली
आली लाली गो-या गाली उतूउतू चालली नटुन थटुन लाजते जनू चांदनी
नटुन थटुन लाजते जनू चांदनी
नकोनको नारे असा अबोला रे
उदास तू का ते मला कळेना रे
नको दुरावा तू मिठीत ये ना रे
मिठीत धे ना रे
मनातले सारे नको मनी ठेवू
असा नको नारे अनोळखी होवू
शोधून कुठे तुझ्यातल्या
तुला जरा सांग रे
अबोल स्पर्शाने शहारुनी येऊ
क्षणात या ओल्या विरुन ये जाऊ
मिठीत त्या लागेल का
मला तुझा थांग रे
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
हरवूनी तुझ्यात मी
पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो….
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
ती
तुझ्या नशील्या नजरेत मीही गुरफटते शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते
तो
हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो..
तो तुझीच होते जगणेही माझेमी विसरते
करु नयेते सारे काही तुझ्या साठी करतेर
ती
ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो..