Tufan Aalaya - तुफान आलया
एकजुटीन पेटल रान
तुफान आलया
काळ्या भुईच्या भेटीला हे
आभाळ आलया
भेगाळ माय मातीच्या ह्या
डोळ्यात जागलीया आस
घेऊन हात हातामंदी
घेतला लेकरांनी ध्यास
लई दिसांनी भारल्या वानी
शिवार झालया
एकजुटीन पेटल रान
तुफान आलया
काळ्या भुईच्या भेटीला हे
आभाळ आलया
पिचलेला विझलेला टाहो
कधी न कुणा कळला
तळमळलीस तू करपुनी
हिरवा पदर तुझा जळला
छळ केला पिढीजात तुझा
गं उखडून वनराई
अपराध किती झाले पण
आता शरण तुला आई
नभ पाझरता दे जलधन सारे
बिलगु तुझ्या ठाई
मग परतुन आता हिरवा शालु
देऊ तुझ आई
उपरतीन आलिया जाण
जागरं झालंया
एकजुटीनं पेटल रान
तुफान आलया
काळ्या भुईच्या भेटीला हे
आभाळ आलंया
जरी रुजलो उदरात तुझ्या
कुशीत तुझ्या घडलो
स्चार्थाचे तट बांधत सुटलो
अन् वैरी तुझे ठरलो
चालवूनी वैराचे नांगर
नासवली माती
छिन्न तुझ्या देहाची हि चाळण
उरली आता हाती
आम्ही हाल उन्हाचे मिटवून सारे,
आज तुझ्या पायीं,
बघ परतून आता हिरवा शालू
देऊ तुज आई,
उपरतीनं आलिया जाण
जागरं झालंया
एकजुटीनं पेटल रान
तुफान आलया
काळ्या भुईच्या भेटीला हे
आभाळ आलया
जागरं झालंया
एकजुटीनं पेटल रान
तुफान आलया
काळ्या भुईच्या भेटीला हे
आभाळ आलया