www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

Gorya Gorya Galavari

Swarg Ha Nawa

Gorya Gorya Galavari

गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली

नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली

आला नवरदेव वेशीला, वेशीला गं , देव नारायण आला गं
मंडपात गणगोत सारं बैसलं गं म्होरं ढोलताशा वाजि रं

सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची गं छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासरा
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी … ग पोरी सुखाच्या सरी …
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली

Swarg Ha Nawa Vatato Hawa

स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा

चिमणे घरटे सजले साजरे, इवले सुख हे फुलले आज रे
भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐक ना
प्रेम गीत छेडीतो उरात पारवा

बघुनी अपुले घर स्वप्नातले
सजणी झुलले तनमन नाचले
जुळली नाती दोन जीवांचे
जीव हे झाले एकरूप साजणा

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top