Utkhanan
उत्खनन
कलावंताने,
प्रतिभेची पालवी आटून
मोहर झडू लागलल्याची
चाहुल लागताच
आत्मपरीक्षणाची पहार घेऊन
खणायला सुरवात करावी.
आपल्याच मुळाशी
निबर झालेल्या यशाचे अहंगड
नाहीतर अपयशाचे न्यूनगंड
गुठळ्या होऊन तिथे घट्ट चिकटलेले दिसतील
त्याना तिथून तातडीने हूसकावणं गरजेचं आहे
वास्तवाच्या काठीने
कारण त्यांच्या मगरमिठीतून
मुळांची मोकळिक नाही झाली
तर उभं झाड करपायला वेळ लागत नाही
– गुरु ठाकुर
लाखाची गोष्ट …. किती सहजतेने मांडलीस तू कवितेत!
एखादी छान कलाकृती झाली तरी त्यात मी जास्त रमत नाही असं म्हणतोस , हे कसं जमतं तुला? त्या धुंदीत जास्त न राहता त्यातून बाहेर पडण्यासाठी चित्र काढतोस म्हणजे वेगळं काही करतोस पुन्हा मन आणि मेंदू कोऱ्या कागदाप्रमाणे व्हावा म्हणून….
अपयशातून बाहेर पडतात लोकं हे ऐकलं होतं पण यशातूनही बाहेर पडणारा तू पहिलाच भेटलास बाबा..
तुझी फिलॉसॉफी काही निराळीच आहे म्हणून भावते
छान