Vaishakh
Vaishakh – वैशाख
बाहेर ऊत आषाढाला
दे माय धरणी ठाय
आतल्या व्याकूळ वैशाखाचं
तूच सांग करु काय?
तिथे सर सरीवर
मृदगंधाची त्यात भर
इथे आत फक्त तहान
कसं राखू तिचं भान
मधून मधून कधीतरी
वावटळीगत ऊठे हूल
तुझे वारे घेऊन येतात
तुझा गंध तुझी भूल
पुन्हा पुन्हा दाटून येतं
झरत मात्र कधीच नाही
झरलं जरी चुकून माकून
तहानेला पुरत नाही
जाती सर आभाळभर
आस तुझीच लावून जाय
आतल्या व्याकूळ वैशाखाचं
तूच सांग करु काय?
-गुरु ठाकूर
खूप छान….
खूप खूप सुंदर काव्य
खुप सुंदर 👌👌👌
Beautiful.. as always!! Completely relays the feelings !!