Varkha
वर्ख
आधुनिकतेच्या नावाखाली
समाजावरला संस्कृतीचा वर्ख
अनावश्यक जोखड म्हणून त्वेषानं
खरवडून काढू पहाणाऱ्यांना
हे माहितच नसावं का?
की
ज्या क्षणी तो वर्ख निघेल
त्या क्षणी मोकळं होईल
अदिम काळापासून
केवळ संस्कृतीच्या बंधनात
गुरफटून राहिलेलं श्वापद?
फांद्या छाटण्या आधी
पाळंमुळं कळावी लागतात
असं म्हणतात ते उगाच नाही….
-गुरु ठाकूर
अगदी नेमक्या शब्दात अचूक मांडणी तूच करू शकतोस गुरू!
Agadi barobar!
आजच्या समाजाचं प्रतिबिंब.हि भिती आहेच खरतर.
भिती आणि काळजी रास्त आहे.
Jeva kalel teva ushir jhalela asel….
खूप छान.. वर्ख म्हणजे ?
वर्ख म्हणजे पातळ पापुद्रा – thin layer.