Vyatha
व्यथा
नात्याच्या पात्याला
अपेक्षांची मुठ
शिवलेले ओठ
जाणिवेचे
खेदाच्या खुंटीला
टांगलेले पाप
सोसवेना धाप
कर्तव्याची
स्वार्थाच्या भिंतीत
विरक्तिचा खिळा
अहिल्येची शिळा
जन्म सारा
– गुरु ठाकूर
नात्याच्या पात्याला
अपेक्षांची मुठ
शिवलेले ओठ
जाणिवेचे
खेदाच्या खुंटीला
टांगलेले पाप
सोसवेना धाप
कर्तव्याची
स्वार्थाच्या भिंतीत
विरक्तिचा खिळा
अहिल्येची शिळा
जन्म सारा
– गुरु ठाकूर
The best ever poetry…
Kamit kami shabdat..purna ayushyachi vyatha mandli..
U earn one more fan sirr..:):)
Sir khoop Chan mandali aahe vyatha
खूप सुंदर.
मुक्या वेलीस आले
शब्दाचे फूल
शाईस भूल
पडली
कमीत कमी शब्दात सर्वोत्तम अर्थ. खूप छान.
Today my many friends posted Her post & storys of Your ” खोचते वीज पंखात ” This poetry.. ! & I am sure on next woman’s day “व्यथा ” Is also spread like same way.. ……!
सर कविता सुंदरच आहे. आजची परिस्थिती हीच आहे. स्त्रियांची भावनिक घुसमट तंतोतंत व्यक्त केली आहे. Thank you.
ह्या घुसमटीतून बाहेर पडण्याची जिद्द प्रत्येक स्त्री ने दाखवावी, ही सदिच्छा.
धन्यवाद!
नेहमीप्रमाणे खूप सुंदर कविता आहे. कवितेचं अल्पाक्षरी सामर्थ्य खूप छान दिसून येतं आहे. कमीतकमी शब्दांत स्त्रीच्या जगण्याचं सगळं सारआलंय. ओवी आणि अभंग या पारंपरिक छंदांच्या पारंपरिक आशयाला छेद देऊन जेव्हा त्यातून नवा आशय व्यक्त होतो , तेव्हा तो अधिक प्रभावी होतो. तुझ्या कवितांमधून ते तू उत्तम प्रकारे करतोस. खूप शुभेच्छा !
धन्यवाद! तुमच्या सारख्या चाहत्यांनी केलेलं कौतुक आणि शुभेच्छा नक्कीच सतत स्फुर्ती देत राहतील.