Wachan Sanskruti

वाचन संस्कृती.

व्या पिढीवर संस्कार नाहीत ती वाया गेलीय भरकटल्यासारखी वागतात,जुन्याना जुमानत नाहीत असे आरोप केले जातात.पण मुळात आपण त्याना संस्कार देतो का?

काही वर्षांपुर्वी पर्यंत चालत आलेली एकत्र कुटंब पध्दती हळू हळु कालबाह्य झाली चौकोनी वा ब-याचदा त्रीकोणी कुटुंबात कामानिमित्त बाहेरच असलेल्या पालकांच्या मुलांवर संस्कार करणारा गुरु असतो तो ईडिअट बॉक्स त्यातल्या त्यात कार्टुन चॅनल्स च्या आणि त्या नंतर कंप्यूटर वा व्हिडिओ गेम्स च्या आभासी दुनीयेत वाढ्णारी मुलं वास्तवापासुन इतकी दूर जातात की त्यातुन बाहेर पडुन एका विशिष्ट वयात जेव्हा अचानक वास्तवाला सामोरं जायची वेळ त्याण्च्यवर येते तेव्हा ती बिथरतात. कारण हे विश्व त्यांच्या करता भयंकर असतं.त्यांनी पाहिलेल्या त्या रंगीबेरंगी आभासी वास्तवापेक्षा खूप निराळं मग ती बिथरतात. कंप्युटर गेम मधे थाड्थाड गोळ्या घालुन शत्रुला संपवयची सवय अस्लेल्या त्यांच्या मेंदुला बेकारी, संघर्ष, भ्रष्टाचार यासारखे छुपे पण जिवघेणा हल्ला करणारे जगण्ण नको करुन सोडणारे शत्रू झेपतच नाही अन मग ती डिप्रेशन मधे जातात आत्मह्त्येचा मार्ग स्विकारतात. मग पालकना प्रश्न पडतो आपण याना सगळं दिलं तरी ती अशी का वागली?.आमच्या वेळी काही नव्हतं तरी आम्हई उभे राहिलो तगलो. स्वत:चं विश्व उभं केलं आणि याना काय कमी पडलं? या प्रश्नाचं उत्तर आहे संस्कार.. जे त्याना मानसिक बळ देतील. जे आधिच्या पिढीला आजोबा आजी अशा जेष्ठांकडुन मिळ्त ब-याचदा आई कडून मिळत पण आताच्या कुटूब पद्धतीत ते शक्य होत नाही. त्यांच्याच संगोपना करत दिवस रात्र एक करणा-या पलकाना तेवढा वेळ देताच येत नाही माग अशावेळी काय करावं? कोण करणार हे काम?

याचं उत्तर एकच. उत्तम साहित्य’ ते त्यांच्या पर्यंत कस पोचवता येईल याचा प्रयत्न व्हायला हवा. त्याना ज्या संस्काराची गरज आहे ते आपल्या साहित्यातुन होऊ शकतात. माझ्या आईवडिलांनी बालवयातच माझं बोट हळूच पुस्तकांच्या हातात दिलं अन मग त्यानीच मला चालायला बोलायला समाजात वावरायला शिकवलं. वाचनाच्या या व्यसनामुळे असेल नंतरच्या आयुष्यात अनेक व्यसनांपासुन मी शेकडो मैल दूर राहिलो. कारण माझा गुरु पुस्तकं होती. नामवंत साहित्यीकानी माझं सम्गोपन केलं मला घडवलं त्याच्या साहित्यातून. यशाने हुरळून जाउ नये आणि अपयशाने खचू नये हा विचार माझ्या बालमनावर रुजला…तसेच अभ्यासोनी प्रकटावे ना तरी झाकोनी असावे हा देखील. म्हणुन कुठलंच काम पूर्ण रिसर्च शिवाय. १०० टक्के तयारी शिवाय केलं नाही.

नव्या पिढीत जिद्द आहे. पण त्याना झटपट यश हवं असंतं अर्धवट तयारीने का होईना लवकर प्रवाहात ऊडी मारायची वृत्ती असते ती त्याना तळाशी नेते. त्याही परिस्थीतीत विचारांची संस्कारांची साथ असेल तर ती वर येतात नाही तर व्यसनांच्या आहारी जातात. या करता त्याच्या पर्यंत कोवळ्या वयातच उत्तम साहित्य पोचायला हवं. साहित्य म्हणजे शब्द केवळ नाहित तर उत्त्म विचारांची जोड असलेलं शब्दभंडार. त्यातुनच त्याना चांगलं काय वाईट हे ओळखणारे संस्कार आपोआपच मिळतील. त्यांच्या पंखात बळ आहेच त्याला विचारांची दिशा मिळेल. आणि क्षितिजापार झेपावायचं त्यांचं स्वप्न ही सत्यात येईल.

2 replies
  1. Siddhi
    Siddhi says:

    Kids will never do it because we asked them to. They will copy our actions always. If we read they will inevitably read too.

    Reply
  2. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    kiti yogya mandle aahes tu… kharach aajchya pidhila vachan kinva changlya sahityachi aavad nahi , vachan snskar he kiti mahtwache astat nahi?! computer game kinva TV he kiti soppe madhyam aahe tyanchyasathi batan dable aani khel suru pan tyat tyanchi involvement kiti?? buddhila chalna milte ka ? kinva kaan aani dole yanchyavr kay snskar hotat he pahtay kon ? karan vibhakt kutumb paddhati aani palakanna vel nahi snvad sadhayala aani snskar karaylahi…

    pustakansarkha Guru aani mitr asel aani vachan he jar vyasan asel tar ! tar aayushya hi ek aanadyatra tharel … ghari palakani aani shalet shikshakani he snskar ghadvayla havet. vachan manan aani chintan yatun vichar ghadtat…

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*