www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

Jaguni Ghe Jara

Jaguni Ghe Jara

विसरु कालच्या उद्याच्या ये जरा
जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा
ही तुझी ज़िंदगी दो क्षणाची नशा
घे जरा आज तू हात हाती तिचा
जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा

या मनाला नवे पंख देऊ
पापण्याना नवे स्वप्न देऊ
भिडूनी ये जिवनाला
विझण्या आधी सुखाला
फिरसे शिलगावूया ना ये जरा
उधाण वारे नवे किनारे
मुठीत तारे…येतील सारे
चल जीवनाला ये तू साद दे ना रे

शोध सा-या तुझ्या तूच वाटा
हो किनारा तूझा तूच आता
मिळूनी चल झेलूया ये
सगळया बेधुंद लाटा
पिउया तुफान सारे ये जरा
नको आता हे डोळ्यात पाणी
तुझ्याच साठी असेल कोणी
चल जीवनाला ये तू साद दे ना

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top