www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

Kaljat Mukkam Kela

Madanike

Kaljaat Mukkam Kela

नकळत माझ्या लइ दिसानी
असा जिव्हारी रुतला कोनी
भलत्या येळी मोहर फुटला
आणि शिर्शीरी पानोपानी…

जरी होता साधा भोळा .. त्यानं अवचित भिडवुन डोळा सारा नजरेनं कारभार केला
कसा कदी बाइ त्यानं .. मला कळलाच न्हाइ काळजात मुक्काम केला
कोरस-
कुणी सरदार मोठा की तालेवार होता या खेळामदी तो मुरलेला
कि नुस्ताच पावना गर्दितला तुझ्या रुपानं झपाटलेला
अंतरा १
झाली जिवाची घालमेल सुरु.. उमगेना काय मी करु
जाई तोल आता नजरेचा लागलीया उगा भिरभिरु
कुठं गेला कदी कोन्या गावा
त्याचा लागेना काही सुगावा
अगंबाई बाई बाई..काळजात मुक्काम केला
कोरस-
कुणी कारभारी मोठा की सरकारी होता शिक्कारी त्यो ट्पलेला
कि नुस्ताच पावना गर्दितला तुझ्या रुपानं झपाटलेला
अंतरा १
नाव पुसाया नवता येळ सारा घटकेत झाला खेळ
माझी मलाच इसरुन गेले जवा डोळ्याला भिडलं डोळं
जिव अलगद कापुस झाला
पिसं भलतंच लावुन गेला
अगंबाई बाई बाई..काळजात मुक्काम केला
कोरस-
कुणी फेटेवाला होता की टोपीवाला होता तुझ्या इश्कात भरकटलेला
कि नुस्ताच पावना गर्दितला तुझ्या रुपानं झपाटलेला

Madanike

तो चटक लावुन येड्या जिवाला
कशाला घाल्तेस कुलुप व्हटाला
उनाडलंय बग काळीज माझं
उर्रात वाजतो ढोल
मदनिके घडीभर थांबुन बोल…

ती काय तुझ्या मनात आलं माझ्या ध्यानात
जिथे तिथे तुझीरे घाई घाई घाई
तो पोरी तुझ्या रुपानं उठलंय तुफान
रात रात झोप मला नाई नाई नाई
ती नको उतावळा तू होवु जरा धिरानं घे
तो नको मधाळ बोलुन टाळू जरा मिठीत ये
पिसाटलाय जीव उधाणलाय
त्याचा सुटाया लागलाय तोल
मदनिके घडीभर थांबुन बोल…

ती लाज भिड सोडुन रित भात मोडुन
घालु नको पिंगा तू थांब थांब थांब
तो वाट तुझी बघुन जीव गेला विटुन
जाउ चल निघुन लांब लांब लाब
ती नको चोरुन मारुन राजा थाटामाटानं ये
तो नको आडून बोलू तू राणी एक ईशारा दे
झाकु नको गुज मनातलं
जरा व्हटाची मोहर खोल
मदनिके घडीभर थांबुन बोल…

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top