Hava Kashala kana
हवा कशाला कणा?
हवा कशाला कणा?
इथे लढायचंय कुणाला?
अस्मितेच्या भानगडीत
पडायचंय कुणाला?
बिनकण्याचंच मोकळं वाटतं
कुठेच काही अडत नाही
कितीदाही वाकलो तरी
आता फरक पडत नाही.
नसेना का ठाउक कुठे
काय चाल्लंय देशात
आमचं इथे छान चाल्लंय.
आपल्या आपल्या कोषात ..
माणुसकी ,बांधिलकी ,
श्रद्धा, निष्ठा ,मेळ
नुस्त्या चर्चा वांझोट्या
नी शब्दांचेच खेळ
निबर नेते गबर मंत्री
घोटाळ्यांच्या वार्ता
ओळखु येईना नेमकं
यातलं कर्म आणि कर्ता
विझली ज्योत क्रांतीची
गहाण पडली अस्मिता.
कैलासवासी स्वाभिमानाकरता
दोन मीनीटं शांतता…
खूप छान …भावनांच्या वादळात हरवलेला कणा …आपल्याच विश्वात रमून जाण्याचा छंद हा जुना
Vaatun jaat asahi kityekada..khup chhan lihilayes Guru da!!..Aani blog lihinyasathi khup khup dhanyawad, karan tula vachn mhanje amchyasathi ek parvanich aahe. Tuze paintings hi khup sundar aahet. Tuz he pustakrupi darshan amhala asach ghadat raaho hich apeksha. (sry for reply in minglish)
Ek number kavita …..!!!
धन्यवाद!