www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

आवशीचो घो – Aavshicho Gho

Aavshicha Ghow

आवशीचा घोव

आवशीचा घोव माझो
करू तेचा काय
तेचौ पाय नाही थाऱ्यावर
पण त्याच्या पुढे मला
काही थोर नाय
माझा जीव भारी त्याच्या वर
हट्टी थोडा जिद्दी थोडा हाय
नी तरी पण बाप माझा
गुणाची गाय ..

राव नको झिला असे
माझे गुण गांव
अरे तू माझ्या माथ्यावर
काय करु सांग
तुका किती समजांव
तू रे सदीचोच वाऱ्यावर
मस्ती तुझी साधीसुधी नाय
नी तरी पण झील माझो
गुणाची गाय ..

हट्टी थोडा जिद्दी थोडा हाय
नी तरी पण बाप माझा
गुणाची गाय ..

आहे थोडा सनकी जरी रे
दुनिया त्याची उल्टी जरी रे
त्याला त्याची मर्जी प्यारी रे
बाप बाप बाप हो आवशीचो घो माझो
बाप बाप बाप नी कायनाय नेम तेचो
बाप बाप बाप हो आवशीचो घो माझो
आवशीचा घोव माझो
करू तेचा काय
तेचौ पाय नाही थाऱ्यावर
पण त्याच्या पुढे मला
काही थोर नाय
माझा जीव भारी त्याच्या वर

त्याचा तोरा uuu
त्याचा पारा uuu
त्याचा इंगा uuu

त्याची मस्ती uuu
त्याची खोडी uuu
लाडीगोडी uuu

तसा साधा भोळा हाय
कधी कधीहोतो माय
जनू दुधावर्ची साय..

कधी पारा चढतो
आभाळाला भिडतो
तरी विरघळतो

खोड्या त्याच्या अंगी जरी रे
थोडा नटरंगी जरी रे
बाप बाप बाप हो आवशीचो घो माझो
बाप बाप बाप नी कायनाय नेम तेचो
बाप बाप बाप हो आवशीचो घो माझो
आवशीचा घोव माझो
करू तेचा काय
तेचौ पाय नाही थाऱ्यावर
पण त्याच्या पुढे मला
काही थोर नाय
माझा जीव भारी त्याच्या वर

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top