www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

जाहीर झालं जगाला – Jahir Zala Jagala

Jahir Zala Jagala

जाहीर झालं जगाला

स्वप्नातल्या चांदव्याचा
लागीर झालं जीवाला
झाकुन होतं मनाशी
जाहीर झालं जगाला

क्षणभर जग हे
विसरुन सगळे
दे एवढासा दिलासा
होशील तू श्वास माझा..

अतंरा-

टिचभर गोडी तळमळ थोडी
दिसभर लावनू येड्या जीवाला
हरपनू जातं हरवनू जातं
समजनू घेशील का या मनाला

विसरत मीही चालले उभ्या जगाला
तोल जरातू सावर येना
बिलगून राहू ये अबोल या क्षणाला
साद सुखाची ऐकून घेना

क्षणभर जग हे
विसरुन सगळे
दे एवढासा दिलासा
होशील तू श्वास माझा..

अतंरा २ –

सुटलं थोडं अवघड कोडं
निसटून गेलाया पारा दिलाचा
फुल्तंय काही झुर्तय काही
जगनचं हंगाम झाला फुलांचा

कोणीतरी भूल घातली अशी सुखाला
गंध नवा हा दाटून आला
उधळून देहभान टाकता तुझ्याासाठी
रंग मिळाला या जगण्याला

क्षणभर जग हे
विसरुन सगळे
दे एवढासा दिलासा
होशील तू श्वास माझा..

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top