www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

खुळ्या जीवाला – Khulya Jivala

Khulya Jivala

खुळ्या जीवाला

कोरस-
पापणीत तुझ्या पूनव चांदची
कशी सखी भराला आली,
उतू ऊतू चाललं मनाच मोहळ
गालावर लाजची लाली ….

१||खुळ्या जीवाला आस खुळी
खुळ्या जीवाला आस खुळी
गोऱ्या गाली पडे खळी
गुतून रहावी …..
गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा जिवलगा तू जवळी
आस खुळी….

खुळ्या जीवाला आस खुळी
गोऱ्या गाली पडे खळी
गुतून रहावी….
नजर तुझ्यातच रहा जिवलगा तू जवळी, आस खुळी ,

खुळ्या जीवाला आस खुळी.

कोरस –
पापणीत तुझ्या पूनव चांदची
कशी सखी भराला आली,
उतू ऊतू चाललं मनाच मोहळ
गालावर लाजची लाली …

२||तुला पाहता पहाट व्हावी
तुला पाहता पहाट व्हावी
तव चांदची रात नवी,
जडावली मिटताना डोळे
तुझी समोरी मूर्ती हवी ,
तुझ्या मिठीची,तुझ्या मिठीची
असता वाकळ घटकाव्हावी सोनसळी
गुतून रहावी,
गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा जिवलगा तू जवळी
आस खुळी.

कोरस –
पापणीत तुझ्या पूनव चांदची
कशी सखी भराला आली,
उतू ऊतू चाललं मनाच मोहळ
गालावर लाजची लाली .

३||नको दुरावा सात आसवी
ओढ अनामिक भहरत जावी,
हुर हूर सारी मनातली या
न सांगतामी तुला कळावी,
रोज सकाळी ओठावरली
खुडून घ्यावी तूच कळी,
गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा जिवलगा तूच जवळी
आस खुळी,

खुळ्या जीवाला आस खुळी
गोऱ्या गाली पडे खळी,
गुतुन रहावी नजर तुझ्यातच
रहा जिवलगा तू जवळी
आस खुळी ……

कोरस –
पापणीत तुझ्या पूनव चांदची
कशी सखी भराला आली,
उतू ऊतू चाललं मनाच मोहळ
गालावर लाजची लाली .

आस खुळी, आस खुळी ..!!

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top